राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. एकीकडे आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली असताना, दुसरीकडे त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सगळ्या पार्श
.
संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिरसाटांवर आरोप केला की, “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत.” यावर प्रतिक्रिया देताना, हा व्हिडीओ त्यांच्या स्वतःच्या बेडरूममधील आहे आणि त्या बॅगेत पैसे नाही, तर कपडे आहेत, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले होते. या सर्व प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आली हे कबूल केले आहे. पण आयकर विभागाला ही उघडी बॅग दिसत नाही का? असाही सवाल भास्कर जाधव यांनी केला.
नेमके काय म्हणाले भास्कर जाधव?
पैशाने भरलेली बॅग संजय शिरसाट यांच्या रुममध्येच होती. त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेत सरळ सरळ पैसे दिसत होते. ते पैसे त्यांचे नसतील तर मला वाटते की त्यांनी ती पैशांची बॅग कुठल्यातरी एका शिक्षण संस्थेला किंवा कुठल्यातरी एखाद्या चांगल्या कामाला दान करून टाकावी, असा सल्ला भास्कर जाधव यांनी संजय शिरसाटांना दिला. ती बॅग आणि पैसे माझे नाहीत ती मला मिळालेले आहेत आणि हे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे मी या पैशांचा दानधर्म करतोय असे सांगावे आणि पुण्य मिळवावे, असे भास्कर जाधव म्हणाले.
हे सगळे अंतर्गत राजकारणातून घडतंय
संजय शिरसाट यांचा व्हिडिओ जवळच्याच कुठेतरी माणसाने काढला असेल किंवा तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकमेकांचा पत्ता कापायचे काम सुरू आहे, अशी शंका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांचा पत्ता कापून झाला, त्यानंतर जयकुमार गोरे यांची विकेट पडता पडता राहिली आणि आता संजय शिरसाट यांची विकेट पडली पाहिजे यासाठी अंतर्गत राजकारणातून हे सगळे घडत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
या लोकांना निवडून दिल्याचा जनतेला पश्चाताप
भास्कर जाधव पुढे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये या लोकांचे सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होतोय. मोठ्या प्रमाणात यांचे आमदार निवडून आल्यामुळे ही मस्ती आलेली आहे. विरोधी पक्ष हा थोडा आहे आणि आमचा आवाज दाबला जातोय. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत. आपण यांना या ठिकाणी आणून काय केले याचा विचार जनतेने केला पाहिजे.
हे ही वाचा…
बॅगमध्ये पैसे दिसताना कपडे असल्याचे कसे म्हणू शकता?:अंजली दमानियांचा संजय शिरसाटांना सवाल, पैशांचा फोटोही दाखवला
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, यात ते आरामात बनियान घालून बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी त्यांचा पाळीव कुत्रा असून, त्याच व्हिडीओमध्ये पैशांनी भरलेली बॅगही दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, 50 खोक्यांपैकी एक खोका दिसला, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाटांना खिजवले आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हा व्हायरल व्हिडीओ ट्वीट करून शिरसाट यांच्यावर निशाणा साधत थेट एक आव्हान दिले आहे. पूर्ण बातमी वाचा…