हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात तापलेले वातावरण अद्याप शांत झालेले नाही. ठाकरे बंधू आणि विरोधकांच्या दबावामुळे हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला असला, तरी त्या निमित्ताने राज्यभरात भाषिक अस्मितेचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच आता गोव्य
.
गोव्याचे राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई हे नुकतेच डोंबिवलीतील केरळ समाजम् मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन व उत्सव समारंभाला उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी संपूर्ण भाषण मल्याळम भाषेतच केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत मनसे नेते राजू पाटील सोशल मीडियावर याबाबत भाष्य केले आहे. प्रत्येकाने आपापली भाषा आणि संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मान ही ठेवावा हीच अपेक्षा असते, असे मत राजू पाटील यांनी व्यक्त केले. राजू पाटील यांच्या पोस्टची चर्चा होत आहे.
नेमके काय म्हणाले राजू पाटील?
राजू पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “आज डोंबिवलीत गोव्याचे राज्यपाल डॉ. पी.एस. श्रीधरन पिल्लई हे केरळ समाजम् डोंबिवली अंतर्गत मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास आले होते. या मल्याळम कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण संवाद मल्याळममध्ये साधला. आपल्या भाषेवर इतकं प्रेम असणारे हे दक्षिणेकडील राज्यातील लोक आपल्या भाषेसाठी इतके कडवट असतात. अर्थातच त्यांचा हा कडवटपणा त्यांच्या भाषेवर असलेल्या प्रेमापोटी असतो आणि तो असलाच पाहिजे. याच संस्थेचे अध्यक्ष वर्गीस सर हे आम्ही भेटल्यावर उत्तम मराठी बोलतात हे ही इथे प्रकर्षानं सांगावेसे वाटते. सांगण्याचा हेतू हाच आहे की, इथे राहणाऱ्यांनी त्यांचा वेगळेपणा जपत इथल्या संस्कृतीशी एकरूप झाल्यावर आपल्या देशातील विविधतेतील एकताच आपल्याला दिसते ना? प्रत्येकाने आपापली भाषा आणि संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मान ही ठेवावा हीच अपेक्षा असते. यात कोणत्या भाषेचा आणि लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल राजू पाटील यांनी केला. राजू पाटील यांच्या या पोस्टची चर्चा होत आहे.
हे ही वाचा…
भाषा जोडण्याचे काम करते तोडण्याचे नाही:उत्तर प्रदेश- महाराष्ट्राचे जुने नाते, राज ठाकरेंनी वाचले पाहिजे- बृजभूषण सिंह
उत्तर भारतीय नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. भाषा लोकांना जोडते, ती तोडत नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांच्यातील नाते तुमच्या वागण्यामुळे तुटणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी राज ठाकरेंनी वाचले पाहिजे ते वाचत नाही असे वाटते असा टोलाही लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा…