Tesla India Entry: अखेर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची भारतात एन्ट्री होत आहे. अनेकदा भारतात टेस्लाच्या कार स्पॉट करण्यात आल्या होत्या. मात्र आता प्रत्यक्षात या कारची प्रतीक्षा संपणार आहे. टेस्ला इंडियात अधिकृतरित्या एक शोरूम सुरू करणार आहे. मुंबईत टेस्लाचे हे शोरूम सुरू होणार आहे. 15 जुले रोजी टेस्लाचे भारतातील पहिले शोरुम बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स (BKC) मध्ये सुरू होणार आहे. या शोरुमसह टेस्लाची साउथ आशियात एन्ट्री होत आहे. जवळपास 4000 स्वेअर फुटमध्ये टेस्लाचे हे शोरूम सुरू होत आहे.
मुंबईतील बीकेसीमध्ये टेस्लाच्या शोरुमचे काम जवळपास संपत आलंय. हे शोरुम ग्राहकांसाठी एक्सपीरिएंस सेंटर म्हणून काम करेल. ज्यामुळं ग्राहकांना टेस्लाच्या कार जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. टेस्ला भारतात डायरेक्ट टू कस्टमर रिटेल मॉडलसोबतच वाहनांची विक्री करणार आहे. कारच्या विक्रीनंतर तुम्हाला मदत लागल्यास ब्रँडसोबत स्थानिक कर्मचारी असतील. जे विक्रीनंतरही ग्राहकांना लागणाऱ्या मदतीसाठी उभे असतील.
मुंबईनंतर टेस्ला देशाची राजधानी दिल्लीत पुढील शोरुम सुरू करणार आहे. अलीकडेच टेस्लाने मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात सेल्स एक्झिक्टूटिव्ह, सप्लाय चेन, इंजिनियरिंग आणि आयटी, ऑपरेशन बिझनेस सपोर्ट, चार्जिंग इन्फ्रा, एआय आणि रोबोटिक, सेल्स आणि कस्टमर सपोर्टसह विविध विभागात नोकरीसाठी अर्ज मागवले होते.
टेस्लाने लोढा लॉजिस्टिक्स पार्कमधील जागा भाड्याने घेतली आहे. हा करार पाच वर्षांसाठी असून याचे सुरुवातीचे मासिक भाडे 37.53 लाख रुपये आहे. कागदपत्रांनुसार, संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत टेस्ला एकूण सुमारे 25 कोटी रुपये देईल. ज्यामध्ये 2.25 कोटी रुपयांचे डिपॉझिट असेल.
किती असेल किंमत
अधिकृत लाँचच्या आधी टेस्लाच्या पहिल्या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार इंपोर्ट करण्यात आलेल्या कारमधून प्रत्येक कारच्या मॉडलची किंमत 27.7 लाख रुपये असू शकते. यावर 21 लाखांची इंपोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. आता लाँचनंतरच या कारच्या किमतीचा खुलासा होणार आहे. टेस्ला कारचा पहिला सेट भारतात दाखल झाला आहे. टेस्लाची प्रसिद्ध इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडल वाय रियर व्हिल ड्राइव्ह चीनमधील टेस्लाच्या फॅक्ट्रीत भारतात पाठवण्यात आले आहे. कंपनीने या कारचे एकूण 5 यूनिट चीनच्या शांघाईतून भारतात इंपोर्ट करण्यात आले आहेत. Model Y जगातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे.