माणसाला दोन मनं असतात. बाह्य मन हे त्याला भटकवत असतं. तर अंतर्मन योग्य मार्ग दाखवत असते. अंतर्मन हाच आपला खरा गुरु अ असतो. आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर त्याचा आवाज ऐकला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रक
.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या “गुरुगौरव’ सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचार पिठावर प्रमुख पाहुणे डॉ. बब्रुवान मोरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जे सामर्थ्य गुरु जवळ आहे ते देवाजवळही नाही. गुरु मार्ग दाखवत असतो. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. गुरूंच्या मार्गदर्शनानेच आयुष्याचं सोनं होतं, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने महा गुरू गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह देऊन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आयक्यूएसी विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना “गुरु गौरव’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी सर्वांचे आभार मानले.
भारताचा नावलौकिक येथील गुरु परंपरेमुळे जगभर पोहोचला ^जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या आपल्या भारत देशात गुरूंची मोठी परंपरा आहे. आज जगामध्ये भारताचा नावलौकिक येथील गुरु परंपरेमुळे आहे. आपल्या गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. त्यामुळे गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. – डॉ. बब्रुवान मोरे