मयूर तांबडे/नवीन पनवेल : कळंबोली येथे राहणाऱ्या आठवी इयत्तेतील तेरा वर्षीय नील कमलेश चौधरी याने तुळशीच्या पानावर विठ्ठल साकारले आहे. त्याच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे.
नील चौधरी याला चित्रकलेची आवड असून त्याने आत्तापर्यंत शिवाजी महाराजांची स्टोन पेंटिंग, विठ्ठल रखुमाई, गणपती, नानासाहेब धर्माधिकारी, रोनाल्डो यांच्यासह अनेक चित्रे काढली आहेत. याबद्दल त्याला अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने नील चौधरी याने तुळशीच्या पानावर विठ्ठलाची प्रतिकृती साकारली.
आषाढी एकादशीचं निमित्त पनवेल-कळंबोली येथील तेरा वर्षीय विद्यार्थ्याने चक्क तुळशीच्या पानावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचे चित्र साकारले आहे. नील कमलेश चौधरी याने हे चित्र साकारताना त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विठुरायाच्या दर्शनाला काही भाविक जाऊ शकत नाहीत. मात्र, आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना एक वेगळा आनंद देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. जवळपास दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याने ही कलाकृती साकारली.