नागपूर जिल्ह्यात 138 नागरिकांचे स्थलांतर, कुहीत 222.2 मिमी पाऊस: विदर्भात पावसाचे 7 बळी; नाशिक, धुळे, जळगाव, नगरला आज पावसाचा इशारा – Nagpur News



गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात वेगवेगळ्या घटनांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात १३८ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून आणखी २ दिवस पावसाचा जोर राहण्याचा इशारा हवामान

.

नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही भारतीय हवामानशास्त्र विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जायकवाडी धरणामध्ये ६७.०२ टक्के पाणीसाठा

जायकवाडीत ५७,३०७ क्सुसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामध्ये नांदूर मधमेश्वरमधून १२,६२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दारणा ३,५०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून २,२०५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणातून ६,९०० भंडारदरा ३,२९० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ६७.०२ टक्के झाला असून जिवंत पाणीसाठा १४५४.९८९ दलघमी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24