रोडवर अंगठ्या विकणारा छांगुर बाबा 100 कोटींचा मालक; हिंदू तरुणींना… बाबाचे महाकांड पाहून पोलिस हादरले


Changur Baba 100 Crore Assets ed Investigation luxury lifestyle : उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी बलरामपूर जिल्ह्यातील जलालुद्दीन उर्फ ​​छांगुर बाबा याला अटक केली आहे. रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती सापडली. अटकेनंतर धर्मांतराचे मोठ रॅकेट उघडकीस आले. छांगुर बाबाचा महाकाड पाहून पोलिसही हादरले आहेत. हा बाबा हिंदू तरुणीचे अत्यंत भयानक पद्धतीने धर्मांतर करायचा. 

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या बेकायदेशीर नेटवर्कशी संबंधित चौकशी दरम्यान छांगुर बाबाला अटक करण्यात आली.  छांगुर बाबाबाबकडे  अब्जावधी रुपयांची मालमत्ता आणि परकीय निधी सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलरामपूरसह नेपाळच्या सीमावर्ती भागात हिंदू संघटनांच्या प्रयत्नांमुळे दोन दिवसांपूर्वी काही लोक घरी परतले तेव्हा जलालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबा यांचे नाव समोर आले. यानंतर, एसटीएफने बलरामपूरमधील उत्तरौला येथे छापा टाकला आणि जमालुद्दीन उर्फ ​​घांगूर बाबा, त्याची सहकारी नीतू उर्फ ​​नसरीन आणि इतरांना अटक केली. छांगूर बाबावर 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

छांगूर बाबाचे खरे नाव जलालुद्दीन शाह असे आहे. तो  बलरामपूरच्या रेहरा माफी गावचा रहिवासी आहेत. 2010 पूर्वी ते सायकलवर मौल्यवान दगड, अंगठ्या आणि काळ्या जादूच्या वस्तू विकायचा. परंतु गेल्या 15 वर्षांत छांगूर बाबा आणि त्यांच्या टोळीने परदेशी निधीतून कोट्यवधींची मालमत्ता कमावली आहे. यूपी एटीएसच्या मते, छांगूर बाबाच्या टोळीने 15 वर्षांत इस्लामिक देशांमध्ये सुमारे 40 वेळा प्रवास केला आणि हवालाद्वारे 40 हून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे 100 कोटी रुपये ट्रान्सफर केले. छांगूर बाबा अफाट संपत्तीचा मालक  परदेशी फंडिंगमुळे  छांगूर बाबाने अफाट संपत्ती जमवली. छांगूर बाबाने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये शोरूम, आलिशान कार आणि बंगले खरेदी केले.  

लव्ह जिहादमध्ये अडकवून तसेच काहींना पैसे किंवा परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तो हिंदू तरुणींचे धर्मांतर करत होता.   वेगवेगळ्या जातींच्या मुलींना धर्मांतरासाठी आणण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले. ब्राह्मण, सरदार आणि क्षत्रिय मुलींना इस्लाम स्वीकारण्यासाठी 15 ते 16 लाख रुपये देण्यात आले. मागास जातीतील मुलीसाठी 10 ते 12 लाख रुपये आणि इतर जातीतील मुलींसाठी 8 ते 10 लाख रुपये देण्यात आले.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24