बहिणीने सांगितले तर भाऊ ऐकेल, तुम्ही अजित दादांना सांगा: आंदोलक शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी, ताईंचे थेट देवेंद्र फडणवीसांकडे बोट – Mumbai News



आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला. आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनात त्या प्रत्यक्ष सहभागी झाल्या. या वेळी उपस्थित शिक्षकांनी सुप्रिया सुळे यां

.

यावर प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार माझे भाऊ असले तरी सरकारचे निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतले जातात, असे म्हणत त्यांनी ‘देवेंद्र फडणवीस हाय हाय’ अशी घोषणा दिली आणि आंदोलनाला अधिक तीव्रता दिली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज शिक्षकांच्या मागण्यासाठी विधान भवनात जाते सरकारची चर्चा करू. जर काही निर्णय घेत नसतील तर मी उद्या दिवसभर तुमच्या सोबत असेल. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी आमदार रोहित पवारांना देखील या प्रश्नाबाबत विधानभवनात बोलावे यासाठी फोन लावला. रोहित पवार विधानभवनात आहेत, त्यांना मी याबद्दल सरकारशी बोलायला सांगितले असल्याचे सुळे यांनी आंदोलकांना सांगितले.

मी दोन-तीन शिक्षकांना सोबत घेऊन विधानभवनात जात आहे. उद्या मी शरद पवारांची तुमची भेट घालून देते, शांततेच्या मार्गाने चर्चेला बसू. तुमच्या सुखदुःखांसाठी सरकारकडे वेळ नाही. आज शरद पवार रायगड मध्ये आहेत. आपल्याला या विरोधात लढावे लागणार आहे. आझाद मैदानावर बसून काही होणार नाही. मागण्या मान्य नाही झाल्या तर विधानभवनात येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी शिक्षकांशी बोलताना सांगितले.

शिक्षकांचे आंदोलन नेमके कशासाठी?

राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 च्या अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, दहा महिने उलटूनही सरकारकडून अद्याप कोणतीही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

राज्यात सध्या 5,844 अंशतः अनुदानित शाळा कार्यरत आहेत, ज्यात 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक आणि 3,040 उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.

शासनाने टप्प्याटप्याने अनुदान देण्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात एकाही शाळेला निधी मिळालेला नाही. याशिवाय अधिवेशनात यासाठी कोणतीही पुरवणी मागणीही मांडण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सर्व शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघाचे समन्वयक संजय डावरे यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी सरकारकडे तातडीने टप्पा अनुदान वितरित करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24