कर्ज परतफेडीची अजिबात आवश्यकता नसल्याची थाप मारून सारा परिवर्तनला (सावंगी) राहणाऱ्या प्रियंका रवींद्र निकमने मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी प्रोग्रॅमच्या (सीएमईजीपी) फाइल मंजूर करण्याचे आमिष दाखवले. शहरातील किमान 300 जणांना तिने गंडवले आहे. 4 वर्षांपासून
.
अंदाजे एकूण 60 कोटींची ही लूट आहे. सारा परिवर्तनच्या बी-विंग मधील आलिशान फ्लॅट क्रमांक-7 मध्ये प्रियंका पती, सासू आणि मुलांसह राहते. तिचे सर्वाधिक टार्गेट महिला आहेत. फळभाजी विक्रते, धुणी-भांडी करणाऱ्या महिला, नोकरदार महिला, नोकरी करणाऱ्यांच्या पत्नी, पार्लर चालक, व्यवसायिक महिला, रिक्षाचालक, नोकरदार, बचतगटातील महिलांनाही तिने लुबाडले आहे. पोलिस कॉन्स्टेबल महिलांना सुद्धा तिने सोडले नाही. नोकरदारांनाही कर्जाचे अमिष देऊन 300 जणांकडून किमान 60 कोटी रूपये लाटले आहेत.
असे आहेत कर्जासाठीचे खरे नियम
1. CMEGP कर्जासाठी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असते.
2. प्रकरणे संबंधित बँकेत जातात. त्या वेळी कागदपत्रे प्रकल्प अहवालासह बँकेत जमा करणे गरजेचे असते.
3. बँकेचे लोन ऑफिसर अर्जदाराने व्यवसायासाठी दिलेल्या जागेची पाहणी करतात. व्यवस्थापकांना अहवाल देतात.
4. कोटेशनवरील गरज पाहून व्यवस्थापक कर्ज मंजूर करतात. कोटेशन देणाऱ्यांच्या खात्यावर कर्जाची मंजूर रक्कम बँक जमा करते.
5. कोटेशनच्या व्यापाऱ्याकडे पैसे येतात. ते कर्जदारास यंत्रे, कच्चा माल पुरवतात. रक्कम कर्जदाराला देत नाहीत. नंतर कर्जदार 65% फेडतो.
प्रियंका म्हणे, ‘परतफेडीची गरज नाही’
1. सीएमईजीपीचे गरिबांचे कर्ज मंजूर. पण त्यांनी लिहून दिले की, ‘आम्हाला मंजूर कर्जाचे पैसे नको आहेत.’
2. बजेट परत जाऊ नये म्हणून बँक अधिकारी दुसऱ्यांना सीएमईजीपी कर्ज देतात, असे आमिष दिले.
3. 20 हजार दिले तर ते 25 लाख देतात. 10 हजारांच्या बदल्यात 5 व 48 हजार दिले तर 50 लाखांची थाप मारली.
4. खात्यावर पैसे जमा झाले की कर्ज परतफेडीची गरज नाही, असे सांंगत काहींकडून 5 लाख तर काहींचे टप्प्या- टप्प्याने 85 लाख घेतले.
5. प्रियंकाने शक्यतो कॅश घेतले. फोनपे, गुगलपेनेही रक्कम घेतली. किमान 300 जणांकडून 60 कोटी लुटल्याची माहिती आहे.
सर्व कर्ज मंजूर होणारच
कर्ज मिळवून देणारच आहे. मी एकटीने पैसे घेतले नाहीत. एसबीआयच्या मॅनेजर मनीषा चव्हाण यांना पैसे दिल्याचे पुरावे आहेत. उद्या सर्वांसमक्ष त्या मॅडमना हजर करणार आहे.’ -प्रियंका निकम, बोगस एजंट या प्रकरणासंबंधी तुमच्याकडे आणखी काही पुरावे असल्यास 9423188500 नंबरवर कळवा.
सोने विकले, व्याजानेही घेतले
वडिलांच्या निवृत्तीचे पैसे दिले. सोने विकले, नातेवाइकांकडूनही घेतले. मी जवळपास 35 लाख दिलेत. असंख्य महिला फसल्यात. पोलिसांनी परत मिळवून द्यावेत. – संगीता होसूरकर, पीडित
कुठलेही कर्ज फेडावेच लागते
जिल्हा उद्योग केंद्राने एकही एजंट नियुक्त केला नाही. एजंट लोकांची फसवणूक करतात. कर्ज कुठलेही फेडावेच लागते, असे डीआयसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.