जायकवाडी धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होते. मात्र या वर्षी मेपासूनच नगर आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला. १९७७ आणि १९७८ मध्ये जायकवाडी धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात निम्म्यापेक्षा अधिक भरले होते. त्यानंतर ४७ वर्षांनंतर पहिल्यांद
.
विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत सर्वाधिक ५९ दलघमी अर्थात ५९०० कोटी लिटर पाण्याची आवक झाली आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी दिली. या वर्षी १ जूनपासून ५३२ दलघमी आवक झाली. साधारणपणे १९ टीएमसी पाणी आले. सध्या ४३ हजार ८०० क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
गाेंदियात झाडावर वीज पडून मृत्यू
झाडावर वीज पडून ते धावत्या दुचाकीवर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना तिरोडा तालुक्यातील सातोना-बोपेसर मार्गावर साेमवारी ७ जुलैला सकाळी घडली. जिवचंद यादोराव बिसेन (४६) असे मृत दुचाकीस्वाराचे तर चिराग जिवचंद बिसेन (१६) असे मुलाचे नाव आहे.
नागपूरसह विदर्भात ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस
प्रादेशिक हवामान खात्याने नागपूरसह विदर्भात ९ जुलैपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. ८ जुलैपर्यत ऑरेंज अलर्ट दिलेला असून ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.