जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनात एक, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही दिनात दोन तक्रारी प्राप्त झाल्या. दोन्ही कार्यालयात आज, सोमवारी ही कारवाई पार पडली. दरम्यान जुन्या ११ तक्रारींचा निपटारा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्या
.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी लोकशाही दिनाची कारवाई पार पडली. पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे जिल्हा परिषद व जिल्हाकचेरीत फारसे तक्रारदार पोचले नाहीत. जिल्हा कचेरीत लक्ष्मीकांत भामकर, प्रिया खांडेकर या दोघांनी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्याचे निर्देश सभाध्यक्षांमार्फत देण्यात आले. याशिवाय जुन्या तक्रारींचा आढावा घऊन त्या सोडविण्याचेही निर्देश देण्यात आले.
यावेळी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदार अश्वीनी जाधव, वरुडचे नायब तहसीलदार नामदेव गडलिंग, नायब तहसीलदार प्रमोद काळे, नायब तहसीलदार जगदीश मंडपे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे, डीडीआर कार्यालयाचे अधीक्षक जे. एस. गासे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रमेश पांडे, जि.प. चे कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय येऊतकर, पर्यवेक्षक अधिकारी जितेंद्र राठोड, भूमी अभिलेखचे ए.जे. तायडे, पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे प्रकाश सोळंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.एम. बागडे, नंदिनी वासनिक, प्रणोती दहाट, रत्नदीप तायडे, प्रवीण बंड, व्ही. आर. उगले, एस.आर. कावनपुरे, अजीत राठोड, जी. ए. लोखंडे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.