Raigad Minister: रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरुन पुन्हा महायुतीत वाद पेटलाय. यावरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच नाराजी व्यक्त केलीय. मविआच्या काळात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद दिलं होतं. आता फडणवीसांनी देखील त्यांनाच पालकमंत्रिपद दिलं. असं म्हणत थोरवेंनी फडणवीसांची तुलना उद्धव ठाकरेंशी केलीये.
रायगडच्याा पालकमंत्रिपदावरून शिंदेंच्या आमदारांमध्ये अजूनही नाराजी कायम आहे. पालमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवेंनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंसोबत केलीय. तीन आमदार असताना शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळालं नाही. उद्धव ठाकरेंनी देखील रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलं होतं. आणि फडणवीसांनीही तेच काम केलंय. असं म्हणत महेंद्र थोरवेंनी नाराजी व्यक्त केलीय.
निधीवाटपावरुन महायुतीमध्ये पुन्हा एकदा खदखद सुरु असल्याचं उघडकीस आलंय. अजित पवारांकडून निधीवाटपामध्ये दुजाभाव सुरु असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय. यावेळी थोरवेंनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. अर्थमंत्री अजित पवार यांच्या कडून खासदार सुनिल तटकरे निधी वळवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सुनील तटकरेंवर आरोप करण्याची महेंद्र थोरवेंची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील थोरवेंनी सुनील तटकरेंवर आरोप केले आहेत. तसंच कथित सिंचन घोटाळ्यावरून देखील महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना इशारा दिला होता.
पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने आले होते. शिवसेनेच्या विरोधामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदला स्थगिती देण्यात आली. मात्र, अजूनही यावर तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर टीका सुरूच असते. दरम्यान पुन्हा एकदा थोरवेंनी पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याला हात घालत राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.
दोन्हीकडचे नेते कडक शब्दात टीका
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत थेट सुनील तटकरे यांनाच इशारा दिला होता. सुनील तटकरे यांनी नेहमी स्वतःच्या घरात पदे घेतली हे शिवसेना खपवून घेणार नाही. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हायला पाहिजेत यासाठी सुनील तटकरे यांनी माघार घ्यावी असं ते यावेळी म्हणाले. तसंच जोपर्यंत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही अशी भूमिका महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर आयुष्यात राष्ट्रवादी पुढे मी कधीच नमस्तक होणार नाही असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना आव्हान दिलं होतं. दरम्यान, महेंद्र थोरवे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी थोरवेंवर पलटवार केला होतं. सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय महेंद्र थोरवे यांचे राजकारण चालत नाही, आमदार थोरवे रायगडचा वाल्मीक कराड, असल्याची घणाघाती टीका घारे यांनी केली होतं. या वादावर योगेश कदम यांनी लवकरच पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल असं म्हटलं होतं. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटत नाहिये. भरत गोगावले, सुनिल तटकरे या दोघांमध्ये आणि त्यांचे कार्यकर्तेही आता उघड उघड टीका करत आहेत. नॅपकिनच्या वादानंतर दोन्हीकडचे नेते कडक शब्दात टीका करत आहेत. आता जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार, आणि दोन्ही पक्षही नरमाईची भूमिका घेतायेत का याकडे लक्ष आहे.