जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम व कर्तव्याप्रती उत्तरदायी करण्यासाठी ‘आय गॉट कर्मयोगी’ हा नवा उपक्रम पुढे आणण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ नवे अभ्यासक्रम पूर्ण करावयाचे आहे. हे अभ्यासक्रम
.
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा हा नवा उपक्रम शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार लागू करण्यात आला आहे. या प्रशिक्षण पोर्टलवरील विविध अभ्यासक्रमांपैकी किमान ५ अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट शासकीय सेवकांचे कौशल्यवृद्धीकरण आणि कार्यक्षमता सुधारणा असे ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपर्यंत ‘आय गॉट’ (आयजीओटी) पोर्टलवरील किमान ५ प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर केलेला नसेल, त्यांची वेतनवाढ १ जुलै २०२५ पासून थांबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर सूचना तात्काळ कळवून प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश शासनाच्या डिजिटल प्रशासन व लोकसेवा सुधारणा धोरणाशी सुसंगत असून, आय गॉट कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध विविध कौशल्याधारित कोर्सेसमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत अधिक सक्षम होण्याची संधी उपलब्ध होत आहे.
लोकांना अधिक चांगली सेवा मिळेल
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे. स्वाभाविकच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असल्याने लोकांना अधिक चांगली सेवा मिळेल. मुळात या बाबी वेतनवाढीशी संबंधित असल्याने त्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंधनकारक झाल्या आहेत. एकंदरीत कर्मचारी आणि नागरिक अशा दोहोंच्याही हिताची ही योजना आहे. – संजीता महापात्र, सीईओ, जिल्हा परिषद, अमरावती.