मुंबई किंवा महाराष्ट्र काय फुकटात मिळालेला नाही; त्रिभाषीक धोरणावरून चिन्मयी सुमितनं सरकारला सुनावले खडेबोल


Chinmayee Sumit on Hindi Language Controversy : मराठी भाषेसोबत तिसरी भाषा म्हणून जिथे हिंदी आणण्याचा प्रयत्न सुरु असताना आता त्याचे जीआर रद्द करण्यात आले आहेत. मात्र, या बाबतची कमिटी जी नेमण्यात आली होती. त्या कमिटीला तिसरी भाषा कशा प्रकारे आणण्यात येईल. या बाबतच्या सुचना देण्यात आल्याचं आरोप समन्वय समितीनं केला आहे. तर आज आझाद मैदानात या समन्वय समितीनं आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री चिन्मयी सुमीत आहे. याविषय झी24 तासशी बोलताना चिन्मयीनं तिसरी भाषा आणण्याचा विरोध का आहे यावर बोलताना दिसली. 

चिन्मयी याविषयी बोलताना म्हणाली, ‘मी कलाकार म्हणून याला पाठिंबा द्यायला आले असं नाही तर गेली 15 वर्ष मी या चळवळीत आहे. मराठी अभ्यास केंद्रातर्फे मी काम करते. ज्यावेळी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पहिलीपासून आपल्याकडे त्रिभाषा सुत्र अवलंबण्यात येणार आहे. याविषयी जेव्हा पहिल्यांदा बातमी आली होती तेव्हापासून आम्ही आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनात यावेळी नागरी प्रतिसादासोबत जे सम विचारी राजकीय पक्ष आहेत त्यांनी देखील यात सहभागी व्हाव यासाठी आम्ही अशा पक्षांना पत्र लिहिलं होतं. अशात जे राजकीय पक्ष समविचारी आहेत त्यांनी यात उत्तम प्रतिसाद दिला.’ 

पहिलं आंदोलन ते आताचं आंदोलन

पहिल्या आंदोलनाविषयी सांगत चिन्मयी म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा आंदोलन केलं होतं. त्यानंतर 29 तारखेला आम्ही जीआरची लाक्षणीक होळी केली. त्यालाही राजकीय पक्षांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यासोबत नागरी प्रतिसादही मिळाला. एवढ्या वर्षांमध्ये आम्हाला पहिल्यांदा इतका प्रतिसाद मिळतोय.’ 

नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षेखाली जी समिती तयार करण्यात आली, त्या समिती संदर्भात जो जीआर काढण्यात आला आहे. त्यात तिसऱ्या भाषेची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात यावी याविषयी सांगितलं तर काढून टाकता येईल याचा काही उल्लेख नाही. याविषयी बोलताना चिन्मयी पुढे म्हणाली, ‘हा एक छुपा प्रकार आहे. राजमार्गानं किंवा पुढच्या दरवाज्यानं आणता येत नसेल तर मागच्या दरवाजानं आणायची.  ज्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा ते सतत आपल्याला दाखला देत आहेत. त्याच्यातही याविषयी स्पष्ट निर्देश आहेत कुठल्या टप्प्यावर त्रिभाषी सुत्र असावं. ते पहिलीपासून निश्चितच नसावं असं त्याचं म्हणणं आहे. 6 वर्षांपासून ते 8 वर्षांपर्यंतच्या मुलांना मातृभाषेतच शिक्षण द्यावं, अशी त्यांची सुचना आहे. ती बाजूला करून, फक्त यांना राजकारण करायचं आहे म्हणून पहिलीपासून हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न करतायत.’  

पुढे चिन्मयी सुमित म्हणाली, ‘अशा प्रकारचं गढूळलेलं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. इतक्या वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली. तरीसुद्धा अशा प्रकारचं अजेंडा राबवणारं आणि रेटणारं. त्यातही एकदा जनमताचा कौल कळल्यानंतरही हा उद्दामपणा आहे. आम्ही पुन्हा एकदा समिती नेमू आम्हाला ज्या पद्धतीनं त्रिभाषी धोरण आणायचं आहे. ते आम्ही आणूनच खरे होऊ. असं जे त्यांना वाटतंय आणि ते करू शकतील असं त्यांना वाटत असताना. हे आता शक्य होणार नाही. कारण इतके दिवस मराठी जनता ही बेसावध होती आणि की आंदोलकांनी आंदोलन करावं आणि राजकारण्यांनी राजकारण करावं आणि आपण आपलं जगावं. आता मराठी जनता सावध झाली आहे की त्यांचं देखील म्हणणं आहे की या भाषेसाठी कुठल्याही प्रकारची आम्हाला सक्ती नकोय. आपली जी माय मराठी आहे. मुंबई काय फुकटात मिळालेली नाही किंवा महाराष्ट्र काही फुकटात निर्माण झालेला प्रदेश नाही. त्यासाठी काही लोकांचं रक्त वाहिलेलं आहे. इथे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन घडलेलं आहे. या सगळ्याचा त्यांना विसर पडलेला होता पण आता लोक एकवटलेले आहेत. अशावेळी एखादी भाषा ही अस्त्रासारखं वापरणं हे आता महाराष्ट्रात होऊ शकणार नाही.’  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24