राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर भाजप नेत्यांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळ यांची औलाद असल्याची टीका करत टीकेचा खालचा स्तर गाठला आहे. मुख्यम
.
ठाकरे बंधू शनिवारी तब्बल 18 वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला होता. या अनाजीपंतांनी आमच्यातील आंतरपाट दूर केल्यामुळे आम्ही एकत्र आलो, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर पलटवार करताना आमदार भाजप गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोक्त टीका केली.
उद्धव ठाकरेंनी फडवीसांचा घात केला
गोपीचंद पडळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळांची औलाद आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी बहुमत दिले. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचा घात केला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केली. हे सूर्याजी पिसाळांसारखे काम त्यांनी केले. फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले त्याला काडीचेही महत्त्व नाही.
सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडून लाल दिव्याच्या गाड्या, प्रोटोकॉल, झेड प्लस सुरक्षा आदी सर्वकाही गेले आहे. त्यांच्याकडे सध्या काहीही उरले नाही. आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासही कुणी जात नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याऊलट भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी गर्दी आहे. त्यामुळे उद्धव वैफल्यग्रस्त बनले आहेत, असेही पडळकर यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात बोलताना म्हणाले होते की, आमच्या दोघांमध्ये (राज व उद्धव) जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी… मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत.
भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी अर्थात सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? ते तर सर्वात उच्चशिक्षित आहेत, असे ते उपरोधिकपणे म्हणाले होते.
हे ही वाचा…
भाजप खासदाराचे ठाकरे बंधूंना आव्हान:म्हणाले – हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा
मुंबई – भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्यावरून थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. हिंमत असेल तर हिंदी भाषिकाऐवजी उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे त्यांनी या दोन्ही भावांना डिवचत म्हटले आहे. वाचा सविस्तर