पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि इथे काही लोक निष्पाप हिंदूंना त्यांची भाषा विचारून मारहाण करत आहेत. भाजप अमराठी लोकांवरील अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा मंत्री आशिष शेलार यांनी मनसे आणि ठाकरे गटाला रवि
.
दोन भाऊ आणि दोन कुटुंबे एकत्र आली याचा आनंद आहे. मात्र, दोन पक्ष एकत्र येतील की नाही, हा त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. परंतु कालचा कार्यक्रम हा मांडलेला इव्हेंट होता. एकाचं भाषण अपूर्ण, तर दुसऱ्याच अप्रासंगिक होतं. दोघांच्या भाषणामध्ये प्रामाणिकपणा नव्हता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारने मराठी दिला, तेव्हा या दोघांची तोंडं बंद होती. दोघेही राजकीय भूमिका मांडत आहेत. मराठीशी त्यांना काही देणंघेणं नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, शेलार यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि मनसे यावर आता भाजपवर सकडून टीका करणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप विरूद्ध ठाकरे गट व मनसे संघर्ष पहायला मिळेल.
भाजपच्या पायाखालून जमीन सरकली आहे ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले, आशिष शेलार यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी डॉक्टर पाठवावेत. कारण, मराठी माणसांची दहशतवाद्यांशी तुलना केल्याने असे दिसून येते की आशिष शेलार आणि भाजपच्या पायाखालून जमीन सरकली आहे.