स्कूल बस आणि व्हॅनमधून होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, या विषयीच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालक, शिक्षक पालक आणि प्रशासनाने जागरूक राहिले पाहिजे असे मत राज्याच्या परिवहन राज्यम
.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोन हजार विद्यार्थ्यांना मिसाळ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. माजी नगरसेवक महेश वाबळे आनंद रिठे यांनी संयोजन केले.
मिसाळ म्हणाल्या, वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी, पोलिस पडताळणी, अपघात किंवा गुन्ह्याचा इतिहास तपासणी, वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पॅनिक बटन, अग्नी नियंत्रण स्प्रिंकलर, महिला अटेंडंट आदी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचालकांनी या नियमावलीची जबाबदारीने अंमलबजावणी करावी.
रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पंढरीच्या वारीचा अनुभव विद्यार्थ्यांनी दिंडी काढून घेतला. विठ्ठल,रुक्मिणी सह ज्ञानदेव,तुकाराम नामदेव,मुक्ताई अशा विविध संतांच्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वारीत सहभागी झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माजी प्रबंधक डॉ.सविता केळकर यांच्या स्वरचित ‘पंढरीची वाट पाऊले चालती’ या अभंगाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले.
शाला समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ.शरद अगरखेडकर, शालाप्रमुख अनिता भोसले,उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले व पालखी सोहळ्याला आरंभ झाला. प्रशालेच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांनी पालखी सोहळ्याचे दिग्दर्शन केले.आशा गुरसाळे व मल्हारी रोकडे या शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.गणेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रकला विभागातर्फे आषाढी वारीनिमित्त ‘अक्षरवारी’ या सुलेखनाच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.या प्रदर्शनात महाराष्ट्रातील २० सुलेखनकारांच्या ७०अक्षर कलाकृती सादर केल्या आहे.