राज्यात जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः पुणे
.
हवामान खात्याने या भागात 200 मिमी पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली असून, दरड कोसळण्याचा किंवा पूरसदृश स्थितीचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, नाशिकचा घाटमाथा, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे या नऊ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत आज व उद्या जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.तर, मुंबईसह नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होण्याचा अंदाज आहे.
कोकणात दमट वातावरण
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. चिपळूण, गुहागर, मंडणगड परिसरात सकाळपासून हलक्या सरी पडत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजचा संपूर्ण दिवस दमटपणा आणि अधूनमधून सरी अनुभवायला मिळणार आहेत.
पालघरमध्ये संथ सुरुवात
पालघर जिल्ह्यात मान्सूनची मृदू सुरुवात झाली असून, डहाणू, तलासरी, जव्हार परिसरात हलक्या सरी पडत आहेत. मात्र पावसाचा जोर अजून वाढलेला नसल्यामुळे, शेतकऱ्यांनी पेरण्यांबाबत घाई करू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.