वरळीचा कार्यक्रम हा कौटुंबिक स्नेहमिलन: ही मराठीची नव्हे तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी, भाजपचा ठाकरे बंधूंवर निशाणा – Mumbai News



राज व उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या युतीवर सत्ताधारी भाजपने सडकून टीका केली आहे. वरळीचा कार्यक्रम हा कौटुंबिक स्नेहमिलनाचा होता. ही भाषेसाठी नव्हे तर निवडणुकीसाठी केलेली जाहीर मन

.

आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ही भाषेसाठी नाही तर निवडणुकीसाठी केलेली जाहीर मनधरणी आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. त्यात भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… आणि ते यांच्या लेखी नाहीच!

महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार… त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे.. निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकेची झोड

तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदीच्या सक्तीवरून भाजप विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आज आम्ही (राज व उद्धव) एकत्र आलो आहोत. पुन्हा आपल्यात काड्या घालण्याचे काम होईल. अनाजी पंतांचा तो धंदाच आहे. कुणाच्याही लग्नाला भाजपवाल्यांना बोलावू नका. ते येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाला जेवायला जातील. बरे, एवढे केले तर पुरे. पण ते पोरीलाच पळवून घेऊन जातील. कारण, यांचे स्वतःचे असे काहीच नाही.

भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही तो नव्हता. भाजप हा सर्वात शेवटी आला आणि 57 ची निवडणूक झाली की हे सर्वात अगोदर बाहेर पडले. तेव्हा त्यांचे नाव जनसंघ असे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून देशाभिमान व महाराष्ट्राभिमान शिकायचा का? हे लोक मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. अख्खी मुंबई एका व्यक्तीच्या घशात घालत आहेत. आपण केवळ बघत बसायचे का. आज मुंबईतील सर्वात जास्त जागेचा कुणी मालक असेल तर तो यांच्या मालकाचा मित्र आहे तो म्हणजे अदानी. कुणाची जागा? कुणी रक्त सांडले? हुतात्माच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे आपण रक्ताची शपथ घेऊन आपण मुंबई व मराठीच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. यापुढे आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा…

आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला:उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात; राज यांचा सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24