राज ठाकरेंना चॅलेंज करणारे सुशील केडियांनी मागितली माफी



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणारे उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. 

यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली होती. संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

केडिया यांनी थेट राज ठाकरे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी दिली होती. ‘मी मराठी शिकणार नाही तुम्हीला काय करायचे ते बोल.’ अशा शब्दात पोस्ट करत त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी त्यांचे ऑफिस फोडले. त्यांच्या ऑफिसवर नारळ आणि दगड फेकत तोडफोड केली.

सुशील केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना टॅग करत लिहिले की, ‘मुंबईमध्ये ३० वर्षांपासून राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी व्यवस्थित समजत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा?.’

या ट्विटनंतर सुशील केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?’ त्यांची ही वादग्रस्त पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24