श्रीरामपूर येथील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची तब्बल ७ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत घडली होती. या प्रकरणी करणाऱ्या सहा जणांविरोधात मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील कापसाच
.
अंबिका महिला पतसंस्थेकडे गहाण असलेल्या २६२५ कापूस गाठींची परस्पर बेकायदेशीर विक्री करून आर्थिक फसवणूक केली. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मनमाड येथे भाडेतत्त्तवावर ठेवलेल्या २६५० कापूस गाठी गोदामात सुरक्षित असल्याची खोटी माहिती पतसंस्थेला दिली. पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी मनमाड येथील गोदामात येऊन कापूस गाठीची पाहणी केली असता प्रथम त्यांना विरोध दर्शवला. नंतर बालाजी ऑईल मिल यांचा कापूस गाठी ठेवलेला उतारा पाहिला असता तारणाखाली असलेल्या २६५० गाठींपैकी २६२५ गाठींची परस्पर विक्री केल्याचे दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अण्णासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री बालाजी ऑईल मिल या संस्थेचे भागीदार रायभान बावके, महेश मगर, प्रशांत कासार, सागर बावके आणि वखार महामंडळाचे साठा अधिक्षक प्रल्हाद चौधरी व नाशिक येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापक यांच्याविरुद्ध फसवणुकीसह गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. संबंधित फर्मने ७००० कापसाच्या गाठी वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवून त्यावर १६.४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील २६६ प्रकरणांची परतफेड केली होती. उर्वरित प्रकरणातील १०६ गाठी अजूनही तारणाखाली होत्या व त्यावर ७.१४ कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते.