7 जणांचा आरामदायी प्रवास, 26 Km मायलेज; ‘या’ CNG व्हेरिएंटपुढे भल्याभल्या कारही फिक्या


Auto News : मागील काही वर्षांमध्ये भारतात कार खरेदीचं प्रमाण वाढलं असून, मध्यम ते उच्च उत्पन्न गटातील अनेकांनीच विविध धाटणीच्या आणि कंपन्यांच्या कार व्हेरिएंटना पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. इंधनाचे सातत्यानं वाढणारे दर पाहता पेट्रोलच्या तुलनेत अनेकांनीच सीएनजी (CNG Car)लासुद्धा पसंती दिली आणि या श्रेणी सर्वाधिक कारची विक्री करणारी कंपनी म्हणून पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली. 

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 17 कार मॉडेलचा समावेश असून, यामध्ये 12 व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्यायही उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे, तर मारुती हॅचबॅकपासून एसयुव्ही, एमपीव्ही कारमध्येसुद्धा सीएनजीचे पर्याय उपलब्ध आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीनं एकूण 591,730 सीएनजी कारची विक्री केली. यामध्ये 2 मॉडेल असे होते ज्यांचे प्रत्येकी 1 लाखांहून अधिक युनिट विकले गेले आणि आघाडीवर असणारं युनिट होतं अर्टिगा. 

FY25 च्या 12 महिन्यांदरम्यान अर्टिगाच्या 129920 सीएनजी युनिटची विक्री झाली. म्हणजेच दर महिन्याला 10826 युनिटची विक्री होत अर्टिगा देशातील क्रमांक 1 ची सीएनजी कार ठरली. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 8.97 लाख रुपये असून तिचं सीएनजी व्हेरिएंट 11 लाख रुपये इतकी आहे. 

अर्टिगाचे फिचर्सही कमाल 

एमपीव्ही रेंजमध्ये येणाऱ्या मारुतीच्या या कारमध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन असून, त्यातून 103PS आणि 137Nm पॉवर आणि टॉर्क जनरेट होतो. हीच कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये 26.11 किमी / प्रतितास इतकं मायलेज देते. ज्यामध्ये पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाईट, ऑटो एअर कंडीशन, क्रूज कंट्रोल असेही फिचर्स मिळतात. 

हेसुद्धा वाचा : Infosys कडून नारायण मूर्तींना घरचा आहेर! नवं धोरण लागू करत कर्मचाऱ्यांना Work Life Balance च्या सूचना 

आरामदायी प्रवासासाठी उत्तम असणाऱ्या या कारमध्ये 9 इंच टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम मिळते. यामध्ये सुझुकीची स्मार्टप्ले टेक्नोलॉजी देण्यात आली असून, ती व्हॉईस कमांड आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टेड कार फिचर्समध्ये कारचं ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ फेसिंग, ओवर स्पिडींग अलर्ट, रिमोट फंक्शन आणि 360 डिग्री साऊंड व्ह्यू कॅमेरासुद्धा मिळतो. त्यामुळं दूरच्या प्रवासाला इंधनाच्या खर्चाची चिंता न करता आरामदायी प्रवास करत जायचं असेल तर संपूर्ण कुटुंबासाठी अर्टिगा एक उत्तम पर्याय. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24