कॉंग्रेसचे कट्टर समर्थक असणारे व माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण तसेच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विकास कामांना निधी मिळत नसल
.
विकास करायचा असेल तर भाजपसोबत जायला हवे
कुणाल पाटील यांच्या आजोबांपासून वडील व त्यानंतर कुणाल पाटील असे तीन पिढ्या कॉंग्रेसमध्ये होते. परंतु आता कुणाल पाटील यांनी आता भाजपचे कमळ हाती घेतले आहे. विकास करायचा असेल तर भाजपसोबत जायला हवे असे त्यांनी म्हटले होते. कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार आहे. कुणाल पाटील यांचे धुळे जिल्ह्यात व परिसरात चांगलेच वर्चस्व असून याचा आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
नेहरूंपेक्षा जास्त मत माझ्या आजोबांना मिळाली होती
यावेळी बोलताना कुणाल पाटील म्हणाले, तीन पिढ्यांचा वारसा सोडून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. माझे आजोबा 1962 मध्ये जेव्हा पंडित नेहरू यांची अत्यंत मोठी क्रेझ होती, त्यावेळेला संपूर्ण देशात पंडित नेहरू यांच्यापेक्षा जास्त मते मिळवत माझे आजोबा निवडून आले होते. हा इतिहास आमचे उत्तर महाराष्ट्र विसरू शकत नाही. माझे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा माझ्या आजोबांना फियाट गाडी गिफ्ट केली. पण आजोबांनी त्यांची सायकलच वापरली, असा किस्सा देखील त्यांनी सांगितला.
पुढे बोलताना कुणाल पाटील म्हणाले, अनेक वर्षांची मागणी होती की मनमाड इंदौर रेल्वे व्हावी, जेव्हा 2014 साली भाजपचे सरकार आले तेव्हा ही रेल्वे सुरू झाली. असे अनेक प्रलंबित प्रश्न होते जे सुटले असते तर त्याच काळात खानदेशचा विकास झाला असता. आता विकास करायचा असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागणार हा विचार मी केला. जेव्हा विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करत होतो त्यावेळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम घेऊन जायचो तेव्हा ते एका मिनिटांत स्वाक्षरी करून मान्यता द्यायचे.