Sanjay Raut on Raj Thackeray – Uddhav Thackeray Alliance : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची. शिवसेना मनसे युतीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे मात्र, ठाकरे बंधूं एकत्र येवू नये म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदें आणि त्यांचे नेते संभ्रम करत आहेत. झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात शिवसेना नेते ठाकरे बंधूंच्या युतीबाबात भाष्य करताना महायुतीच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून मिठाचा खडा टाकत आहेत. महायुतीचे नेते राज ठाकरेंना भेटून संभ्रम निर्माण करत असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेनं जे ठरवलंय तेच होणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंना भेटून ते हिंदीच्या मुद्दयाबाबत सरकारची भूमिका समजावून सागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील सगळ्या नेत्यांसोबत चर्चा करुन ते राज ठाकरेंची मनधरणी करतील अशी शक्यता आहे. दादा भुसेंच्या भेटीनंतरही राज ठाकरेंचा हिंदीच्या मुद्याला विरोध कायम आहे.. त्यामुळे आता स्वता एकनाथ शिंदे त्यांची मनधरणी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंच्या मनसेनं पहिल्या दिवसापासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. आता थेट मनसेनं 5 जुलैला मोर्चाचं आयोजन करून एल्गार पुकारलाय. आता या मोर्चाच उद्धव ठाकरेही सहभागी होणार हे स्पष्ट झालाय. त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झालाय.. मात्र राज आणि उद्धव यांच्या या एकत्रिकरणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कात्रित सापडल्याची परिस्थीती निर्माण झालीय.. तिहेरी भाषा आणि पहिलापासून हिंदी हे महायुती सरकारचं धोरण आहे.
याच धोरणाला महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनंही पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष असतानाही अजित पवारांनी मात्र पहिलीपासून हिंदीला विरोध केला आणि हिंदी विरोधाचा धागा पकडत ठाकरे बंधू 5 तारखेच्या मोर्चाला एकत्र येताहेत. आणि आपल्या राजकारणाच्या एका नव्या डावाला सुरूवात करताना दिसताहेत आणि इथेच शिंदेंच्या शिवसेनेची दुहेरी कोंडी झाली आहे.