Sanjay Raut Post: मुंबईत मनसे आणि शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल असं खासदार संजय राऊतांनी जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी एक्सवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत हे जाहीर केलं आहे. याआधी मनसेने 5 जुले तर उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेने 7 जुलैला शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मोर्चा जाहीर केला होता. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्रित मोर्चा काढणार आहेत.