राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात नियमबाह्य: एमपीएससीवर कोणाचा दबाव? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप – Mumbai News



राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने खात्यांतर्गत दुय्यम निरीक्षकपदासाठी जाहिरात काढली आहे. परंतु, ही जाहिरात नियमबाह्य असल्या

.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पदभरती असून 115 पदे जवान संवर्गासाठी तर 22 पदे ही लिपिक संवर्गासाठी आहेत. परंतु, ही जाहिरात नियमबाह्य असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर ट्विट करत जाहिरातीचे फोटो शेअर केले आहेत. या जाहिरातीवर आक्षेप घेत ते म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अजब कारभार! राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षक म्हणजेच सब इन्स्पेक्टर या पदांसाठी विभागीय (डिपार्टमेंटल) भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकर भरतीसाठीच्या नियमांमध्ये तरतूद नसतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या लिपीकांसाठीही पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. खरंतर सेवाप्रवेश नियमावलीत अशा पद्धतीची कोणतीही संधी उपलब्ध नाही. लोकसेवा आयोगानेही यावर आक्षेप घेऊन, जोपर्यंत सेवा नियम बदलले जात नाहीत किंवा नवे नियम केले जात नाहीत. तोपर्यंत अशा पद्धतीने विभागीय भरती करता येत नाही, असे मत नोंदवलेले आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, असे असताना, कोणाचे काहीही न ऐकता, लोकसेवा आयोगानेच राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी जाहिरात काढली व त्यामध्ये दुय्यम निरीक्षक पदासाठी खात्यात कार्यरत असलेल्या लिपीकांनाही प्रवेशाची परवानगी दिली. आधी लोकसेवा आयोगाने विरोध केलेला असताना आता लोकसेवा आयोगाने जाहिरात काढलीच कशी? कोणाच्या दबावाखाली हे केले जात आहे, हा प्रश्न उभा राहतोच! लोकसेवा आयोगाने आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि शासनाने त्वरीत ही जाहिरात रद्द करावी, अशी मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24