नियोजन करून नालेसफाईचे काम वेळेत संपवा- उपायुक्त: विविध भागातील नाल्यांची पाहणी; अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आढावा न घेता कार्यस्थळी जावे‎ – Amravati News



पावसाळ्याच्या अनुषंगाने नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन, नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी दिले. यासाठी सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाही

.

या पाहणी दौऱ्यादरम्यान सदर परिसरातील नाल्यांची तसेच संभाव्य पाणी साचणाऱ्या भागांची पाहणी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी केली. तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा या वेळी घेण्यात आला.

शहरात पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे दरवर्षीप्रमाणे सुरू आहेत. तथापि, गाळ उपशाच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणे, हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीत सुधारणा करावी. सर्व नाल्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता, प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचना उपायुक्‍त डॉ. वासनकर यांनी दिल्या. तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या-त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही उपायुक्‍तांनी दिले आहेत.

या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्‍त भूषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, स्‍वास्‍थ अधीक्षक श्रीकांत डवरे, स्‍वास्‍थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते. नाल्यांमध्ये घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे या नाल्याची सातत्याने स्वच्छता करावी. नाल्याच्या एका बाजूला दुमजली घरे, दुकाने व आस्थापना आहेत. तेथून कचरा नाल्यात फेकला जातो. ही बाब लक्षात घेता वारंवार नाला स्वच्छ करावा. नाल्याच्या बाजूला घरांमधून कचरा फेकल्या जाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणी जाळी बसवावी, अशी सूचना उपायुक्‍त डॉ. मेघना वासनकर यांनी केली.

नागरिक कचरा टाकतात तेथे तातडीने जाळ्या बसवा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24