रेडीमेड कपडे व्यवसाय करु असे सांगत एका दाम्पत्याने एका नामांकित कंपनीच्या ब्रँडचा वापर करुन त्याचा माल बनवून देण्याचे बहाण्याने पाच कोटी ४६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवोदिता अमोल नहार आणि अमोल नहार या आरोपी विरोधात वार
.
याबाबत आरोपी विरोधात मोहित जैन (वय- ३५) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोहित जैन यांचे औंध -बाणेर रस्त्यावर एम.एस.फॅशन नावाचे नामांकित दुकान आहे. त्यांचे १९८७ पासून सदाशिव पेठेत जय हिंद नावाने नामांकित रेडीमेड कपडयांचे दुकान आहे. सदर दुकान अनेक वर्षापासून चांगल्याप्रकारे व्यवसाय करत असल्याने त्याची ओळख निर्माण झाली आहे. अमोल व निवेदिता नहार यांची सोशल बफेट नावाची कंपनी सुरुवातीला त्यांना काही रेडीमेड कपडे पुरवठा करत होती. परंतु याचा फायदा घेऊन नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान नाहर दाम्पत्य यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नहार दाम्पत्य यांनी तक्रारदार यांचे वडील वसंत जैन यांच्याशी संर्पक केला आणि त्यांना एम.एस.फॅशन ब्रँडचा वापर करुन रेडीमेड कपडेचा व्यवसाय माॅल्स व मोठ्या इतर बाजारपेठेत करु असे सांगितले. परंतु सुरुवातीला याबाबत तक्रारदार यांचे वडीलांची तयारी नव्हती. मात्र, नहार दाम्पत्य यांनी त्यांना वेगवेगळया गोष्टी सांगत त्यांना व्यवसाय करण्यास राजी केले. मोठ्या प्रमाणात यामाद्यमातून नफा मिळेल असे सांगून मोहित जैन यांच्याकडून सुरुवातीला २५ लाख रुपये घेऊन त्याबाबत नंतर करार देखील केला. त्यावर निवेदिता व अमोल नहार यांचे स्वाक्षरी देखील आहे.
सदर दोघांनी व्यवसाय वाढवून एम.एस. फॅशन ब्रँडचा वापर करुन बाजारात विक्री वाढवली. त्यानुसार मोहित याने चार एप्रील २०२२ मध्ये १.६० लाख रुपयांचा चेक देखील आरोपींना सोपवला. त्यानंतर वेळोवेळी ते पैसे देत गेले परंतु आरोपींनी त्यांना संबंधित पैसे हे कपडे तयार करण्यासाठी गुंतवल्याचे सांगत मोठ्या ऑर्डर मिळत असल्याचे भासवून अधिक रकमा घेत गेले. अशाप्रकारे त्यांनी एकूण सात कोटी ८९ लाख ४१ हजार रुपये घेऊन सदर रक्कम घेतली आहे. त्यापैकी केवळ दोन कोटी ३६ लाख २६ हजार रुपये आरोपींनी परत केले असून पाच कोटी ४६ लाख २५ हजार रुपये परत न करता सदर रकमेची फसवणूक केली. उर्वरित पैशाची आरोपींकडे मागणी केल्यावर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने याबाबत तक्रारदार यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.