काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आषाढी वारीत सहभागी होण्याचा संकल्प: दिवसभर दिंडी क्रमांक 282 मध्ये यवत ते वरवंड पायी चालणार – Maharashtra News



महाराष्ट्राच्या संत परंपरेची साक्ष असलेली आषाढी वारीमुळे राज्यात सध्या भक्तीमय वातावरणात सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वा

.

हर्षवर्धन सपकाळ मंगळवार, 24 जून रोजी सपकाळ हे दिंडीत सहभागी होणार असून, ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत गावातील दिंडी क्रमांक 282 मध्ये सहभागी होतील. ते यवत ते वरवंड गावापर्यंत पायी चालणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म जागवण्याचे काम

याबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीत कोणताही जात, धर्म, पंथ न पहाता शेकडो वर्षांपासून हा विठ्ठल भक्तीचा प्रवास सुरु आहे. सर्वजण विठ्ठ्लाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी चालत जातात. महाराष्ट्र धर्म जागवण्याचे काम या वारीच्या माध्यमातून होत आहे. सर्वसामान्य भक्तांचा सखा विठुराया अशी सावळ्या विठूची ख्याती आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा असंख्य संतांनी महाराष्ट्राला एक अध्यात्मिक वारसा घालून दिला आहे.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, पंढरपूरची वारी व संत परंपरा हीच भारताची खरी ओळख सांगणारा आहे. आज जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे. या वारी परंपरेचा वारसा आपल्याला जपला पाहिजे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेत एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून दिंडीत सहभागी होऊया.

पालखी सोहळ्या दरम्यान ड्रोन उडवणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर कारवाई केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने काल दिवे घाट पार केला. माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातील नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी आणि त्याच्या रील्स करण्यासाठी अनेक तरुणांनी ड्रोनचा वापर केला होता. पालखी सोहळ्या दरम्यान ड्रोन वापरण्यास बंदी केली असूनसुद्धा ड्रोनचा वापर केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी “अँटी ड्रोन गन” चा वापर करुन ड्रोन खाली उतरवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24