नाशिकच्या येवल्यात विवाहितेची आत्महत्या; येवला पोलिसांत हुंडाबळीचा गुन्हा दाखल


पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असताना नाशिकच्या येवल्यात सलग दुसरी हुंडाबळीची घटना समोर आली आहे. येवल्यातील आडसुरेगावात सोनाली चव्हाण नावाचा विवाहितेने आत्महत्या केलीय. घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. दरम्यान सोनालीच्या आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. दोन दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह घराशेजारीलच विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांनी सोनालीचे पती सासू-सासरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येवला उपजिल्हा रुग्णालय येथे न करता नाशिक येथे करण्यात आले आहे. अहवाल अद्याप प्रलंबित आहे रात्री उशिरा पोलिसांनी हुंडाबळीची केस दाखल केली. दोन आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सोनाली चव्हाण हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24