पालखी सोहळ्यात महिलांच्या दागिन्यांची चोरी: बोपोडी चौक आणि खडकीत दोन महिलांचे दागिने लंपास; दोन मोबाईल चोरटे जेरबंद – Pune News



पुण्यातील बोपोडी चौक आणि खडकी परिसरात पालखी सोहळ्यादरम्यान महिलांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका ६८ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.

.

दर्शनासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले. याच सोहळ्यात आणखी एका महिलेच्या दागिन्यांची चोरी झाली. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पालखी मार्गावर तैनात केला आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणीही पोलिसांची गस्त सुरू आहे.

औषध दुकानातून एक लाख २८ हजारांची रक्कम चोरी

औषध विक्री दुकानाचे दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख २८ हजारांची रक्कम चोरून नेल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ओैषध विक्रेत्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय परिसरात पुनमचंद मेडीकल शॉप हे ओैषध विक्री दुकान आहे. तीन चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटला दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील एक लाख २८ हजारांची रक्कम लांबविली आहे.

दरम्यान, मार्केट यार्ड पोलिसांनी दिंडीतील वारकऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. प्रकाश देवराम परिहार (२९, लोहियानगर) आणि मोहम्मद मनान जमाल शेख (२५, मार्केट यार्ड) अशी त्यांची नावे आहेत. श्री शारदा गजानन मंदिराजवळ दिंडी आली असताना या दोघांनी वारकऱ्यांचे मोबाईल चोरले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24