Seven Seater MPV: प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्याकडे चांगली कार असावी आणि त्यामध्ये बसण्यासाठी भरपूर जागा असावी. पण अनेकजण आर्थिक टंचाई असल्यामुळे 7 सीटर कार खरेदी करू शकत नाही. काहीजण तर कार खरेदी करण्यासाठी वर्षानुवर्षे आपल्या कमाईमधून बचत करत असतात. त्यानंतर ते एकाच वेळी खर्च करतात. परंतु, अनेकांना कारबद्दल संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे काहीजण कोणताही विचार न करता कार खरेदी करतात.
कार खरेदी करताना त्या कारबद्दल किंवा आपण आपल्या कुटुंबासाठी कोणती कार योग्य आहे हे पाहणे खूप गरजेचे असते. ज्यामध्ये कारमध्ये कोणते फीचर्स आहेत किंवा कारमध्ये किती लोक बसू शकतात. ही सर्व माहिती घेणं गरजेचं असतं.
सर्वात स्वस्त 7 सीटर कार
जर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबासाठी मोठी कार खरेदी करायची असेल तर 7 सीटर कार आहेत. मात्र, या कारची किंमत खूप आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला सर्वात स्वस्त मिळेल. जी एका कुटुंबासाठी परफेक्ट असेल.
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती Renault Triber आहे. जी एक एमपीवी आहे. सर्वात स्वस्त असून तिचा लूक आणि कारमधील फीचर्स देखील खूपच मस्त आहेत. Renault Triber ही कार एकूण चार व्हेरियंटमध्ये येते. ज्यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ. यामध्ये तुम्ही ही कार व्हाइट, सिल्वर, ब्लू, मस्टर्ड आणि ब्राऊन या रंगात खरेदी करू शकतात. या कारची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरु होते.
जाणून घ्या फीचर्स
या कारच्या टॉप मॉडेल RXZ मध्ये दुसऱ्या रांगेत एसी आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टीपल स्टोरेज स्पेस, ड्युअल फ्रंट ग्लोव्ह बॉक्स आणि अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखी वैशिष्ट्ये आहेत.
या कारमध्ये 1.0 लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 72bhp आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. ते 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच पाच-स्पीड AMT युनिटसह येते. ही कार 19 किमी मायलेज देते. तसेच या कारमध्ये तुम्हाला 4 एअरबॅग्ज ज्यामध्ये पुढे 2 आणि बाजूला 2. ग्लोबल एनसीएपीने या कारला प्रौढांसाठी 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. तर, मुलांसाठी 3 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे.